कुंभी कासारी साखर कारखाण्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीत समविचारी आघाडी उभी करू : कॉग्रेस नेते शामराव सुर्यवंशी
सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर ,पन्हाळा , राधानगरी ,गगनबावडा या चार तालुक्याचे कार्यक्षेत्राचा समावेश असलेल्या आणि शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या कुंभी कासारी साखर कारखाण्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीत समविचारी आघाडी उभी करून कारखाण्यात सत्ता बदल करू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष व कॉग्रेस पक्षाचे नेते शामराव सुर्यवंशी यांनी निकाल न्युज प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
गेली १५ वर्ष कुंभी कासारीत घराणेशाहीची सत्ता आहे. कारखाण्याचा वापर राजकारणासाठी झाल्याने कारखाना कर्जबाजारी झाला आहे . वारेमाफ खर्चामुळे शेतकऱ्यांची ऊसाची बिले वेळेत मिळत नाहीत, नोकरभरतीचा आर्थिक बोजा कारखाण्यावर पडला आहे . कुंभी कासारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर गेल्या तीन दशकापासुन कृषि औद्योगिक उद्योग प्रकल्प उभारले गेले नाहीत . त्यामुळे विकासाबरोबर दळणवळण क्षेत्रात प्रगती झालेली नाही.
सुर्यवंशी म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील विविध शेतकरी संघटना, समविचारी कार्यकत्यांची नवी मोट बांधण्यात येणार आहे. कुंभी कासारी साखर कारखाण्याचा राजकिय आड्डा मोडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.