ताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू पॅलेसवरील अजित पवारांची भेट ठरतेय चर्चेचा विषय; कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता.

कोल्हापूर :

भाजपवर नाराज असलेल्या आणि थेट प्रदेशाध्यक्षांना बदेखल करत नाराजी व्यक्त करणाऱ्या खासदार संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी कोल्हापुरातील न्यू पॅलेस गाठल्याची चर्चा आहे. तेथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. ही भेट मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतली असली तरी याला पदर मात्र संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची असल्याचे कळते.

खासदार संभाजीराजेंनी दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यामध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी राजकारणापासून थोडे दूर राहणेच पसंत केले.पक्षातील काही नेत्यांनी त्यांना बेदखल केल्याने ते नाराज झाले होते. याच नाराजीचा फायदा घेत भाजपने संभाजीराजेंना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार करत सन्मान केला. आता मात्र ते भाजपवर नाराज आहेत. पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच त्यांनी अंगावर घेतले आहे. मला कोणी शिकवू नये असे म्हणत थेट प्रदेशाध्यक्षनाच आव्हान देण्याचा प्रयत्न संभाजीराजे यांनी केला. यामुळेमाजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने २०२४ चे ते कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील या पक्षाचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडी स्वतंत्र लढल्यास प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेच्या वतीने मैदानात उतरतील. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह संभाजीराजेंचा पर्याय पुढे येऊ शकेल. सर्वमान्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येण्यास फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. शिवाय मालोजीराजेंनी शहरातून पुन्हा एकदा विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहेच. तोच धागा पकडून सध्या महाविकास आघाडीकडे या घराण्याची वाटचाल सुरू असल्याचे समजते.

या सर्व पार्श्वभूमीवर नाराज संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते . त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे तेथे उपस्थित होते. संभाजीराजे मात्र उपस्थित नव्हते . मुळात संभाजीराजेनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारून नये असे शाहू महाराजांना वाटत होते. पण संभाजीराजेंनी राष्ट्रपती नियुक्त खासदार पद घेत आपली राजकीय वाटचाल सुरू केली. पण, त्यांनी भाजपचा शिक्का बसू नये याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या खासदार पदाची मुदत पुढील वर्षी संपत आहे. सध्या धनंजय महाडिक भाजपचे असल्यामुळे राष्ट्रवादी लोकसभेसाठी उमेदवाराच्या शोधात आहे. अशावेळी संभाजी महाराज हे त्यांना समर्थ पर्याय असू शकतात. यासाठीच आत्तापासूनच पक्षाची व्यूहरचना सुरू असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन वाट तयार करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks