चंदगड : प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका पतसंस्थेची सभा उत्साहात

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पत संस्थेच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ११ टक्के दराने लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तुडये येथील रामलिंग हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. एन. खरुजकर यांच्या अध्यक्षस्थेखाली सभा झाली. प्राचार्य श्रीकांत पाटील उपस्थित होते.
प्रा. नामदेवराव दुंडगेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सभेला सुरवात झाली. संस्थेच्या २४ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. १० वी व १२ वीच्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला. ५० कोटीच्यावर संस्थेचा ताळेबंद गेल्याने संस्थेला चालू आर्थिक वर्षात ८१ लाख ८९ हजार ९o७ रुपये नफा झाल्याचे सांगून अध्यक्ष खरुजकर यांनी संस्थेची मालमत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.
सभासदांचा संस्थेवर विश्वास असल्याने आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संस्थेची स्वभांडवलावर वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. सचिव प्रदिप कुंभार व शाखाधिकारी उज्वल देसाई यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी प्रा. दिपक पाटील, एल. एल. कांबळे, नामदेव कांबळे, मायाप्पा कांबळे, अजित गणाचारी, एन. आर. पाटील, प्रा. सुखदेव शहापूरकर, एस. पी. पाटील, सोनापा गोरल, मारुती पाटील यांनी सभेच्या चर्चेत भाग घेतला. लेखापरीक्षण, थकबाकीदार, नवीन सभासद, गुंतवणूक आदी प्रश्न उपस्थित करुन संचालक मंडळाने याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सभासदांनी सुचना केल्या. मायाप्पा कांबळे यांनी अंदाज पत्रकातील जादा खर्चाच्या तरतुदीवर प्रश्न उपस्थित केला.
अजित गणाचारी यांनी संस्थेची कोवाड येथील दोन गुंठे जमीन विकून उर्वरित दोन गुंठे जागेत इमारत बांधण्याबाबत सूचना केली. संचालक मंडळाने सभासदांच्या सूचनांचा गांभिर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.
शाखा अध्यक्ष अशोक पाटील, एस. के. हरेर, एस. डी. पाटील, जी. एस. पाटील, एन. एस. पाटील, विठ्ठल मोहिते, सुभाष गावडे, सुभाष बेळगांवकर, सुनिल सप्ताळे, डॉ. अरुण जाधव, वंदना यादव, मालन कांबळे, विश्वनाथ फगरे, सदाशिव पाटील आदी संचालक सभेला उपस्थित होते. आर.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले . डॉ. अरुण जाधव यांनी आभार मानले .