आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 लाख नागरिकांनी घेतला पहिला डोस

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे 

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड -19 चे लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यामध्ये एकूण 38 हजार 945 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 18 हजार 363 जणांनी दुसरा डोस घेतला. यानंतर दिनांक 1 फेब्रुवारी 2021 पासून फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण सुरु करण्यात आले. यामध्ये एकूण 41 हजार 472 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 12 हजार 838 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दिनांक 1 मार्च 2021 पासू 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यांचे लसीकरण सुरु करण्यात आले. यामध्ये इतर व्याधी असलेल्या 2 लाख 81 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस तर 6 हजार 895 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 39 हजार 666 नागरिकांनी पहिला डोस तर 17 हजार 413 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 7 लाख 01 हजार 374 जणांनी पहिला डोस तर 55 हजार 509 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks