सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून ७३व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिमाखदार मानवंदना

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सालाबादप्रमाणे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर एनसीसी कडेट्सकडून नेत्रदीपक संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यामध्ये मार्च पास, स्टँडिंग ड्रिल, सायलेंट ड्रिल व एनसीसी गीत असे प्रकार सादर करण्यात आले. परेडची सुरुवात छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणेने झाली.
सिनियर अंडर ऑफिसर ओंकार एकल याने प्रमुख कमांडर, ज्युनिअर अंडर ऑफिसर निलेश पाटील याने स्टँडिंग ड्रिल कमांडर, ज्युनिअर अंडर ऑफिसर वैभव चौगले याने सायलेंट ड्रिल कमांडर म्हणून भूमिका बजावली; तर एएनओ लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी संपूर्ण परेड चे धावते समालोचन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी सर्व कडेट्स चे त्यांच्या सादरीकरणाबद्दल खूपच कौतुक केले, तर सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी संपूर्ण एनसीसी विभागाचे अभिनंदन केले. यामध्ये १५ मुली व २९ मुले आशा एकूण ४४ जणांनी सहभाग घेतला. परेड पूर्ण झाल्यानंतर एनसीसी गीत सादर करण्यात आले. महाविद्यालयाचा एनसीसी विभाग, ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर, भारत माता की जय, वंदे मातरम अशा उत्स्फूर्त घोषणा देऊन प्रजासत्ताक दिनाची सांगता करण्यात आली.
सदर सोहळा कोविड१९च्या सर्व दक्षता घेऊन पार पडला.