ताज्या बातम्यानिधन वार्ता

नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या

या तिघींचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांची मोठी गर्दी होती.

Nanded:

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. पुणे, मुंबईसह मराठवाडयात ठिकठिकाणी पाणीच पाणी साठल्याचं पहायला मिळालं. नांदेडमधील हतगावमध्ये ओढयाला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीसह पुतणी अशा तिघींचा मृतदेह आढळून आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वरवट गावातील ही घटना आहे.

शेतात कामासाठी गेलेल्या अरुणा शिकरगे या महिलेने आपल्या सोबत मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकिताला सोबत नेले होते. दुपारच्या वेळी मुसळधार पाऊस आल्याने अरुणा दोन्ही मुलीला घेऊन घराकडे निघाली होती. यावेळी गावाजवळच्या ओढ्याला आलेल्या पुरात मुलगी दुर्गा वाहून जात होती. मुलीला वाचवण्यासाठी आईने धाव घेतली, यात तिघीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या तिघींचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांची मोठी गर्दी होती.

ओढ्याला अचानक पूर आला, तिघींचा मृत्यू :

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अनेक भागांत भीषण नुकसान केलं असून, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरवट गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ओढ्याला आलेल्या अचानक पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीसह पुतणीचा मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली. अरुणा शिवाजी शिकरगे,तिची मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकिता अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा शिकरगे या शेतात कामासाठी आपल्या मुलगी दुर्गा आणि पुतणी अंकितासह गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने तिघीही घराकडे यायला निघाल्या. मात्र गावाजवळील ओढ्याला अचानक पूर आल्याने, त्यांना घराकडे परतताना अडथळा निर्माण झाला. ओढा पार करत असताना दुर्गा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. तिला वाचवण्यासाठी आई अरुणा धावली, आणि तिच्या मागोमाग अंकिताही पुढे गेली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, तिघीही त्यात वाहून गेल्या.

गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहीम राबवली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केलं. काही तासांच्या शोधानंतर तीनही मृतदेह सापडले. एका कुटुंबातील तिघांचा असा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks