ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूरच्या लेकीचा दिल्लीत डंका, नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

कोल्हापूर प्रतिनिधी –
राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात तिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मागच्यावर्षीसुद्धा राही सरनोबतने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे राहीच्या कुटुंबासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.