ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद ?, नक्की जाणून घ्या !

टीम ऑनलाईन :

राज्यात उद्यापासून कडक निर्बंधलावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे. (weekend lockdown In Maharashtra; Nawab Malik Told)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लादले जाणार आहे. यादरम्यान राज्यात काय सुरु, काय बंद जाणून घ्या.

काय सुरु, काय बंद

शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन

लोकल ट्रेन सुरू राहणार

जिम बंद होणार

अत्यावश्यक सेवांना परवनगी

रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार

अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी

रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील

सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद

गार्डन, मैदाने बंद

जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला

सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही

रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक

बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल

टॅक्सीत मास्क घालावा

कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना

मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी

चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी

बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोज ४० हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks