ताज्या बातम्यामहाराष्ट्र
एक वर्षात सर्व रस्ते होणार टोल नाका मुक्त, हायवेवर लागणार GPS ट्रॅकर

टीम ऑनलाईन :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या एक वर्षभरात देशातील सर्व रस्ते टोल नाके मुक्त होतील. रस्त्यांवरील टोल नाके हटवून त्या ठिकाणी टोल वसूलीसाठी GPS ट्रॅकर लावले जाणार आहेत.
रस्त्यांवरील सर्व प्रवासात टेक्नॉलॉजिचा वापर केला जाईल व जीपीएसद्वारे टोल आकारला जाईल.
टोल नाके काढायचे म्हटले तर टोल कंपन्या मोबदला मागतील. परंतू, सरकारने आगामी एक वर्षात देशातील सर्व टोल नाके हटविण्याची योजना आखली आहे.
टोल नाके हटवणे याचा अर्थ केवळ टोल नाके बंद करणे आहे. टोल नव्हे. सर्व रस्त्यंवर जीपीएस ट्रॅकर लावण्यात येतील.
आपले वाहन ज्या रस्त्याचा जेवढा वापर करेन तेवढाच त्याला टोल आकारला जाईल. आपले वाहन हायवेवर येताच जीपीएसच्या मदतीने फोटो घेतला जाईल तसेच हायवेवरुन उतरल्यानंतरही फोटो घेतलाजाईल. त्यानुसार आपल्याला टोल द्यावा लागेल