ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड शहरासह परिसरामधून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुरगूड शहरांमधून आज सर्व समाजाच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शविण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास समर्थन देण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा”, “मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”,, “मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा जोरदार घोषणा देत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी समन्वयक संतोष भोसले यांनी प्रास्ताविकामधून मराठा समाजाच्या मागण्यांविषयी आणि सुरू असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक सुहास खराडे, ओंकार पोतदार यांनी मनोगते व्यक्त करून पाठिंबा जाहीर केला. संकेत भोसले यांनी आभार मानले.

यावेळी मुरगूड परिसरातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधीही मुरगूड शहरांमधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व समाजातील लोक एकवटले होते.आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुरगुड मधील आणि परीसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, एस.व्ही.चौगले, जयसिंग भोसले, शिवभक्त सर्जेराव भाट, दत्तात्रय मंडलिक, खाशाबा भोसले, विक्रम गोधडे, मारुती पुरीबुवा, महादेव पाटील, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, दत्तात्रय साळुंखे, शशिकांत मेंडके, पांडुरंग चौगले, भगवान लोकरे यांचेसह मुरगूड शहरासह परिसरामधून आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा देण्यात आला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks