मंडलिकांच्या आचार,विचारांचा वारसा जोपासणे हीच आदरांजली ; लोकनेत्याच्या विचारांचा जागर नव्या पिढीने जपावा- डॉ.होडगे
मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी लोककल्याणाच्या शाश्वत अशा पाणी, शिक्षण आणि शेती क्षेत्रात केलेले कार्य भावी पिढीला दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या आचार,विचारांचा वारसा जोपासणे हीच आदरांजली ठरणार आहे . असे प्रतिपादन डॉ. शिवाजीराव होडगे यांनी केले.
हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ६ व्या स्मृतिदि .नानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. विरेंद्र मंडलिक होते.
डॉ .होडगे म्हणाले,दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा राजकारणातला दरारा, त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व आणि संघर्षमय परिस्थितीतून लोककल्याणाचा घेतलेला वसा पाहता असा नेता होणे नाही. छत्रपती शिवराय आणि शाहूंच्या विचाराचे खरेखुरे वारसदार असणाऱ्या या लोकनेत्याच्या विचारांचा जागर नव्या पिढीने जपावा पाहिजे .
अॅड विरेंद्र मंडलिक म्हणाले,राजकारणाचे बाळकडू मला आजोबांकडून वयाच्या १३ व्या वर्षी मिळाले. पण मंडलिक कुटुंबियांपेक्षा त्यांनी सर्वाधिक प्रेम कार्यकर्त्यांना दिले.हमिदवाडा कारखाना स्व. मंडलिकांच्या कर्तृत्वाचे सहकार मंदिर आहे. ते त्यांच्या विचारावर चालेल आणि बहरेल.विचारावर आधारित त्यांचे राजकारण कार्यकर्त्यांनी जपले. यावेळी युवानेते वीरेंद्र मंडलिक यांनी स्वर्गीय मंडलिकांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
यावेळी हिरा शुगर गडहिंग्लजचे संचालक समगोंडा आरभोळे व गडहिंग्लज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज आजरी यांनी मनोगते व्यक्त केली.कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ , जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील ,जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे व संचालक मंडळ ,बिद्री कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे, संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम महाडिक, सत्यजित पाटील मुरगूडकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांच्यासह जिल्ह्यातील विधिव पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी दिवंगत मंडलिकांना आदरांजली वाहिली.
यावेळी कारखान्याचे आजी, माजी संचालक ,मुरगूड नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, खातेप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत कार्यकारी संचालक एन.वाय. पाटील यांनी केले. प्रास्ताविक मधुकर भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन अविनाश चौगले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .