ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुदरगड तहसीलदार कार्यालयावर सोमवारी सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चा

गारगोटी प्रतिनिधी :

१ स्पटेंबर २०२१ च्या रात्री साडेदहाच्या च्या दरम्यान सारे शांत असताना भुदरगड तालुक्यातील मेघोली चा लघु पाटबंधारे तलाव फुटला आणि या परिसाराला जबर तडाखा बसला. तलावाची गळती वेळेत काढली नसल्याने हा अनर्थ घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.तलावाच्या मुख्य गेटलाच भगदाड पडले व हा अनर्थ घडला. हा प्रकार रात्री घडल्याने मोठी जिवित हानी टळली पण झालेली ही घटना दुर्दैवी असून या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारी ठरली असल्याचे मत येथील जाणकार नागरिकांनी व्यक्त केले आहे.

याच घटनेतील आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना न्याय मिळण्यासाठी गारगोटी येथे भुदरगड तहसीलदार कार्यालयावर सर्व पक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन सोमवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात येत असल्याचे पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पत्रकात म्हटल्याप्रमाणे, पाटबंधारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून हजारो हेक्टर शेतीचे झालेल्या नुकसानीबद्दल या शेतकरी आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात येत आहे.

या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत :

  1. मृत महिलेच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
  2. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शासनाने त्वरित भरपाई द्यावी.
  3. शेकडो एकर शेत जमिनीवरील झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
  4. धरणाच्या चौकीदाराची बेकायदेशीर बदली करून धरण क्षेत्र सहा महिने वार्‍यावर सोडणार्‍या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांचे तात्काळ निलंबन करा आणि दबाव टाकणाऱ्या राजकीय पुढार्‍यांचे नाव जाहीर करावे.
  5. जलसंपदा विभागाचे बेजबाबदार अधिकारी अधीक्षक महेश सूर्वे, स्मिता माने, संभाजी भोपळे, सौमित्र शिर्के यांना तात्काळ निलंबित करावे.

सदर पत्रकावर निमंत्रक म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पार्टी, भुदरगड संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिव संघर्ष समिती या राजकीय पक्षांची नावे आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks