काळानंदिगड किल्ला रमला शिवराज्याभिषेक सोहळ्यात

चंदगड प्रतिनिधी :
दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत २३जून २०२१ रोजी काळानंदिगड (कलानिधीगड) किल्ल्यावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला, दुर्गवीर प्रतिष्ठान चे मावळे कायमच शिवभक्तिमध्ये विलीन राहून या अश्या सोहळ्या सोबतच गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखिल कायमच सज्ज असतात, काळानंदिगड किल्ल्यावर अगदि थाटामाटात तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला दुर्गवीरांनी महाराजांना पालखीत बसवून किल्ल्यावर नेण्यात आले, त्या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला व महाराजांची पूजा करण्यात आली.
या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त गडावरती शाहीर व्यंकटेश देवगेकर (बेळगाव) यांच्या पहाडी आवाजमध्ये महाराजांच्या कर्तुत्वाचा व कार्याचा पोवाडा सादर करण्यात आला, तसेच सुरज बिर्जे व मर्दानी खेळ पथक (अनगोळ) यांनी शिवनिश्चय लाठी काठी व मर्दानी खेळ सादर केले. तसेच या सोहळ्यासाठी गोवा मधून शिवाजीराव देसाई, नितीन सावंत, गौरेश गवस, राजेश सावंत,राजाराम फर्जंद, राजाराम पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला.
तसेच दुर्गवीर चे नियोजक अजित पाटील, सागर मुतकेकर व दुर्गवीर प्रतिष्ठान चे मावळे हे उपस्थित होते, सोशल डिस्टन्स चे व नियमांचे पालन करत हा सोहळा अगदी थाटामाटात पार पडला