ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्याला मारहाण

कोल्हापूर प्रतिनिधी :
कळंबा कारागृहातील कैद्यांच्या बरॅकमधील टीव्हीचे चॅनेल बदलण्यावरुन वयस्कर कैद्याला दोघांनी मारहाण केली. सुरेश कचरू वैती असे जखमी कैद्याचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुरेश बैती हे ज्या बरॅकमध्ये राहतात तेथील टीव्हीचे चॅनल बदलण्यावरून त्यांचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातून न्यायाधीन बंदी बैतुल शेख व दस्तगीर शहा या दोघांनी सकाळी दहाच्या सुमारास कळंबा कारागृहात वैती याला मारहाण केली.
कारागृहातील परिसरात पडलेला एक काचेचा तुकडा हातात पकडून दोघांनी त्यांच्या चेहऱ्यावर, नाकावर वार केला. यामध्ये ते जखमी झाले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस स्टेशन मध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.