गावोगावी वटपौर्णिमा महिलांकडून भक्तिभावाने साजरी

कुडूत्री प्रतिनिधी :
वट पौर्णिमा हा सण अगदी भक्तीभावाने महिलांच्याकडून जेष्ट महिन्यात पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येतो.अगदी मनोभावे महिला हे व्रत सर्वत्र साजरे करतात.सकाळ पासूनच महिलांनी गावातील वट वृक्षाकडे उस्फुर्तपणे हजेरी लावली. नटून – थटून महिला हे व्रत पूर्ण करतात.
वट पौर्णिमा या दिवशी महिला वर्ग वडाच्या झाडाला सुत गुंडाळून सात प्रदक्षिणा मारतात.जन्मोजन्मी हा पती लाभूदे व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे असे मनोमनी मागणे महिलांकडून मागितले जाते.व वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
या व्रताचा असा एक समज आहे.सत्यवानाचे लग्न सवित्रीशी झाले.एक दिवस सत्यवान जंगलात लाकडे तोडायला झाडावर चढला असताना घेरी येऊन खाली पडला व मृत्यू पावला असे असताना आपल्या नवऱ्याचे प्राण मिळवण्यासाठी सावित्रीने यमराजचा धावा केला.यमराजाणे काही अटीवर सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केला.आणि हा प्राण वडाच्या झाडाखाली परत केल्याने या वडाच्या झाडाला विशेष महत्व आहे.
हे व्रत विशेष करून अख्या महाराष्ट्रभर साजरे केले जाते.या दिवशी महिला विशेषकरून सुट्टी घेतात व मनोभावे व्रत करतात.तशेच ओटी भरणीचा कार्यक्रम देखील होतो.पाच फळे देखील पूजेसाठी आणली जातात.अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते.