राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथील जाधव बंधूनी जपली सामाजिक बांधिलकी

कौलव प्रतिनिधी :
म्हणतात ना आपणही काही तरीसमाजाच देणं लागतो हो नक्कीच..ज्या मराठी शाळेने आपल्याला घडवले ज्या मराठी शाळेत आपली शैक्षणिक गुरुकिल्ली सुरू झाली..त्या आपल्या मराठी शाळेसाठी आपणही काय तरी करावं असं काही मोजक्या विद्यार्थ्यांच्याच लक्षात येत, जेणेकरून त्यांना त्या मराठी शाळेची जाण असते असेच एक उदाहरण पिंपळवाडी गावचे युवा नेतृत्व जाधव घराण्यातील हुशार आणि कर्तबगार असणारे गोरखभाऊ जाधव व त्यांचे मोठे बंधु सागर जाधव यांनी विद्यामंदिर पिंपळवाडी तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गेले एक ते दीड वर्ष पाण्याची सोय नाही हे जाणून घेऊन नळ पाणी कामासाठी जे काय साहित्य लागतंय ते स्वखर्चातून देऊन आपल्या सर्वांच्या समोर एक आदर्शच जणू या जाधव बंधूनी निर्माण केला खरंच आपलं स्वप्न बघतअसताना मागचाही काही तरी विचार करावा व आपणही आपल्या शाळेसाठी व गावच्या सामाजिक विकासासाठी काय तरी करावं असं मनाशी खूणगाठ बांधून या जाधव बंधूनी असं काम त्यांनी स्वखर्चातून केले आणि भविष्यात विद्या मंदिर पिंपळवाडी च्या विकासासाठी सदैव असेल असे आश्वासन त्यांनी दिले याबद्दल जाधव बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे खरंच अशी माणसे मोजकीच समाजात असतात जणू एखाद्या शिंपल्यातून मोती निघावे असे यांचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असावा आणि भविष्यासाठी आपणही काय तरी समाजासाठी करण्याचा निर्धार यातून विद्यार्थ्यांनी करावा असे वाटते यावेळी शाळेचे शिक्षक बुगडे सर , भोपळे मॕडम,पोपले मॕडम,विकास जाधव ,शिवाजी जाधव,उत्तम जाधव ,दिग्वीजय जाधव आदिसह ग्रामस्थ होते.