धक्कादायक : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू

घराच्या पाठीमागे शेळी चारण्यासाठी गेलेल्या सारिका बबन गावडे यां चार वर्षाच्या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यात सारिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शित्तूर वरून पैकी तळीचा वाडा या गावात राहणारी शाळकरी मुलगी सारिका गावडे आपल्या घरातील शेळींना करण्यासाठी घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेततळीत गेली होती. यावेळी झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला, यात यावेळी सारिकाने आरडाओरडा केला,तेव्हा तिची चुलती धावून आली. यावेळी बिबट्या तिथून पळून गेला. गंभीर जखमी सारिकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले.
बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरली त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वन विभाग व पोलिसांचे पथक तातडीने या ठिकाणी दाखल झाले होते.