ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

भात तरव्यांना जोरदार पावसाचा मारा; रानातील पाखरांकडूनही तरवे फस्त; शेतकऱ्यांना जाणवणार तरवा टंचाईचे संकट

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले

कोल्हापूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात भात पिक घेतले जाते.या साठी शेतकरी वर्ग शेती सेवा दुकानातून महाग बियाणे खरेदी करून भात उगवणीसाठी जमिनीत पेरतो.उगवण झालेल्या याच बियाण्यांना जोरदार आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने व रानातील पाखरांनी तरवे मुळासकट उपटून टाकल्याने व फस्त केल्याने रोप लागणीसाठी तरवे टंचाई निश्चित जाणवणार आहे.अपुऱ्या भात तरव्याच्या संकटा मुळे शेती क्षेत्र काही ठिकाणी पडीक रहाते अन्यता इकडून – तिकडून तरवे गोळा करण्याची पाळी शेतकऱ्यांवर वर्गावर येते.

वर्षभर कुटुंबाची गुजराण चालावी या साठी शेतकरी वर्ग टोकणनी पद्धतीसह मोठया प्रमाणात भात रोप लागण केली जाते.रोप लागणी साठी लागणारे महाग बियाणे खरेदी करून त्याचे तरवे वाफे बनवले जातात.व हे भात तरवे रोप लागणीसाठी वापरले जातात.

मागील चार ते पाच दिवसात जिल्ह्यासह सर्व भागात मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने भात तरव्याला पावसाचा जबरदस्त मारा बसल्याने नुकतेच उगवलेले अंकुर नाहीसे झाले आहेत.रानातील पाखरांनी हे भाताचे अंकुर उपटून मुळासकट टाकले आहेत.व फस्त ही केले आहेत.या मुळे तरवे टंचाईचे संकट शेतकऱ्यांपुढे आवासून उभे राहणार आहेत.परिणामी अशा टंचाईवेळी शेतकऱ्यांना इकडून-तिकडून तरवा उपलब्ध करून आपले क्षेत्र लागण करावे लागते.अधिच वेळी – अवेळी पडणारा पाऊस यास दोन हात करावे लागतातच तर आता नवीन तरवा टंचाईच्या संकटास सामोरे जावे लागणार आहे.

अनेक शेतकऱ्यांनी याआपल्या तरव्यांचे नुकसान झाले असून पुन्हा नवीन तरवे टाकण्याची वेळ आपल्यावर आल्याचे दैनिक जनमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks