मुरगूडला विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळण्याचा निर्णय

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या संदर्भात मुरगूड शहर व्यापारी असोसिएशन, नगरपालिका आणि मुरगुड पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. बैठकीत विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळण्याचा निर्णय घेण्यात आला .
मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत एपीआय विकास बडवे यांनी सर्व व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून दुकाने बंद ठेवली पाहिजेत . तसेच सर्वांनी अँटीजन टेस्ट करून त्याचे सर्टिफिकेट आपल्या दुकानात लावले पाहिजे . जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी ही खबरदारी घेतल्याशिवाय दुकाने उघडू नयेत असे सांगितले.
बैठकीस मुरगूड शहर व्यापारी असोसिएशनचे सदाशिव आंगज यांनी विकेंड लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवावेत औषध दुकान आणि दूध व्यवसाय हे ठराविक वेळतच सुरू राहावेत असे सुचवले . यावेळी मुरगूड नगरपालिका, मुरगूड पोलीस स्टेशन व व्यापारी असोसिएशन या
सर्वांनीच हा निर्णय मान्य करून विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळण्याचा निर्णय घेण्यात आला .
बैठकीस व्यापारी असोसिएशनचे सदाशिव आंगज, गोरुले,अमर चौगले ,युवराज मेंडके, देवेंद्र राजपुरोहित, प्रशांत सणगर, राजू चव्हाण, ओंकार पोतदार, प्रदीप भोपळे आदी उपस्थित होते तर नगरपालिकेतर्फे इंजिनीयर प्रकाश पोतदार ,
जयवंत गोधडे हे उपस्थित होते.