बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर तक्रार दाखल करणार : अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना संघटनेव्यतिरिक्त काही लोक परस्पर भेटून फसवीत आहेत अशा फसविणाऱ्या व्यक्तीवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सेनेचे अध्यक्ष कल्लापा निवगिरे यांनी कळविले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील काही लोक आपल्या बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ ह्या संघटनेचे नाव वापरून गावा गावतुन फिरून आमच्या तडशिनहाळ येथील आँफिस मधून नोंदणी केलेल्या कामगारांना परस्पर भेटून संघटनेचे दुसरे आँफिस पाटणे फाटा येथे सुरू केले आहे म्हणून सांगून नोंदणी पुर्ण होऊन स्मार्ट कार्ड आमच्या तडशिनहाळ येथील आँफिसला आसताना त्यांची आँनलाईन फी 37 भरलेल्या पावती काढून पेट्या वाटप करत आहेत तरी बांधकाम कामगारांना सांगू इच्छितो की त्या लोकांचा आमच्या संघटनेशी काहीच संबंध नाही आणि तुम्हाला स्मार्ट कार्ड शिवाय इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ज्या बांधकाम कामगारानी आम्हाला संपर्क करायच्या अगोदर अशा लोकांच्या कडून कार्ड नसताना पेट्या आणल्या आहेत त्यांना संघटनेकडे कार्ड आसून सुद्धा मिळणार नाही आणि असे कोणी आमच्या संघटनेचे नाव सागुन आपल्या गावात तुमच्या कडे कोणी आले तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्याच्यावर कारवाई करू आमच्या संघटनेचे तडशिनहाळ फाटा व्यतिरिक्त तालुक्यात इतर कोठेही आँफिस नाही तरी तालुक्यातील बांधकाम कामगार बंधुनी आमच्या तडशिनहाळ फाटा येथील आँफिसला भेटून आपले स्मार्ट कार्ड व पेटी घेऊन जावे..असे कल्लापान्ना निवगीरे संस्थापक अध्यक्ष चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ, अध्यक्ष कामगार सेना चंदगड यांनी कळविले आहे.