ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुदाळ ( ता.भुदरगड) येथील श्री.प.बा.पाटील महाविद्यालयाचा १०वी एन. टी. एस. ई. पॅटर्न राज्याला प्रेरणादायी : माध्य. शिक्षणाधिकारी किरण लोहार; महाविद्यालयाचे ( N.T.S.E.)स्पर्धा परीक्षेत तब्बल २० विध्यार्थी पात्र.

मुदाळतिट्टा प्रतिनिधी : प्रकाश पाटील

एन. टी. एस. ई.परीक्षेत प्रशालेचे इ १०वी चे २० विद्यार्थी पात्र ठरून उच्चांकी यश संपादन केले. हा मुदाळचा श्री.प.बा.पाटील एन. टी. एस.ई.चा अव्वल पॅटर्न राज्याला प्रेरणादायी ठरेल.असा विश्वास जि.प.माध्य. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला. ते मुदाळ( ता. भुदरगड) येथील प.बा.पाटील संकुलातील १०वी एन. टी. एस. ई.विध्यार्थ्यांच्या व मार्गदर्शक शिक्षकांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी प.बा. पाटील संकुलाचे अध्यक्ष मा.आमदार के.पी.पाटील होते. तर प्रमुख उपस्थिती सचिव विकास पाटील, गोकुळचे संचालक व खजानीस रणजितसिंह पाटील उपस्थित होते.

स्वागत मुख्याध्यापक एस. एम.पाटील व प्रास्ताविक एम.के.पाटील यांनी केले. यशस्वी विध्यार्थी असेःआदिती काशिद बिद्री जिल्ह्यात ५६ वी,स्नेहल पाटील ( सावर्डे ),विवेक पसारे ( गारगोटी ),विघ्नेश खतकर ( भडगाव ),राजनंदिनी मुसळे (गंगापूर ),श्रेया माणगावकर,( भाटीवडे ),मोहिनीचव्हाण( मुदाळ), आश्लेषा बरगे ( अर्जुनवाडा ),दिव्यराज जाधव ( नरतवडे ),धनश्री पाटील ( मांगेवाडी ),प्रतीक्षा यादव( अर्जुनवाडा ),अनुज पाटील( तुरंबे ),भक्ती कुडीत्रे( पिंपळगाव),श्रीकांत मिसाळ ( कूर),विनायक चव्हाण ( म.कासारवाडा ) अजय पाटील ( उंदरवाडी ),श्रुतीका फराकटे ( बोरवडे ),प्रथमेश मेंगाणे ( निळपण ),श्रुती पाटील(मुदाळ)व प्राची कळमकर ( निढोरी ) यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार यावेळी मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.यावेळी खजानिस रणजितसिंह पाटील म्हणाले,या राष्ट्रीय प्रज्ञा शोध पहिल्या परीक्षेत महाराष्ट्रातून ७७४ मुले निवडली जातात.त्यातील तब्बल २० विध्यार्थी- मुदाळ महाविद्यालयाचे यशस्वी हेत. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा केंद्रीय बोर्ड घेते त्यातून जे विद्यार्थी निवडले जातात. त्यांना १२ वी पर्यंत प्रत्येक महिना १२५० रु.शिष्यवृत्ती मिळते तसेच पदवी पर्यंत प्रती महिना २००० रु. शिष्यवृत्ती मिळते. व पी. एच. डी. साठी यूजीसी ग्रँड नुसार स्कॉलरशिप मिळते.

यावेळी मा.आमदार के.पी.पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले, दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणासाठी स्व.प.बा.पाटील याच्या विचारधारेची कास घेवून हा शिक्षणप्रवास सुरु ठेवला आहे. संकुलातील गुणात्मक शिक्षणाला चालना देण्याचं महत्वपूर्ण काम गुरुवर्यानी केले.आज त्याचंच फलीत म्हणून न भुतो न भविष्यती यश मिळाले आहे. शिक्षणाचा अव्वल पॅटर्न म्हणून मुदाळची ओळख राज्यात सर्वदूर पोहचली आहे.

यावेळी एन .टी. एस. ई. मध्ये पात्र ठरलेल्या आदिती काशिद व राजनंदीनी मुसळे या विध्यार्थीनींची मनोगते झाली .प्रसंगी मुख्याध्यापक एस.एम.पाटील, शाळा व्यव.समिती अध्यक्ष एम.एस.पाटील ,पर्यवेक्षक एस.व्ही.रणदिवे,एस.बी.शिंदे,आर.व्ही.पाटील,जयवंत पाटील आदीसह मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.शिक्षक,पालक उपस्थित होते.
सुत्रसंचलन एस.एम.पाटील यांनी तर आभार ए.एस.कळंत्रे यांनी मानले.

 

रणजितदादांच्या रणानितीला यशाची किनार.

सत्कारप्रसंगी पालकांच्यात चर्चा.
एकाच वेळी एकाच शाळेतील एन. टी. एस. ई.मध्ये एकाचवेळी २० विद्यार्थी पात्र ठरले. हा राज्यात नवा उच्चांक असून संस्थेचे खजानीस रणजितसिंह पाटील यांनी यावेळी स्वतः सर्वाधिक वेळ,योगदान देवून विद्यार्थ्यांसमवेत अनेकवेळा उपस्थित राहून अभ्यासक्रमाचे काटेकोर नियोजन केल्याने घवघवीत यश मिळाले. या यशामागे खजानिस रणजितसिंह पाटील यांची शिक्षणातील रणनीतीचा केंद्रबिंदू असल्याची भावना सत्कारप्रसंगी सोपान खतकर यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks