ताज्या बातम्यामहाराष्ट्र
एक गाव एक गणपती करा : अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
एक गाव एक गणपती साजरा करा, त्यामुळे सामाजिक एकता वाढते, तसेच वेळ, श्रम, पैसा वाचतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुणांनी विधायक दृष्टिकोन ठेवत गाव दारूमुक्त, व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.
मुरगूड येथे श्रीराम मंगल कार्यालयात पोलीस ठाण्यांतर्गत गणेश मंडळाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पो. नि. गजानन सरगर यांनी, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश साळोखे, पोलीस पाटील सविता पोवार, आकाश पाटोळे, राजेश पाटील, उपनिरीक्षक राहुल वाघमारे, प्रशांत गोजारे आदी उपस्थित होते.