ताज्या बातम्या
महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती

रोहन भिऊंगडे /कोल्हापूर
दि. 21 : महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाच्या कामकाजाकरिता नवीन अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीकरिता जिल्ह्यातील प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या तसेच प्राणी कल्याणाकरिता योगदान देणाऱ्या इच्छुक व्यक्तींचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी आपले प्रस्ताव दि. 31 मे पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे ddcahkolhapur@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण यांनी केले.
यापूर्वी बृहन्मुंबई परिसरातील 2 व राज्याच्या इतर क्षेत्रातील 10 असे एकुण 12 अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ 29 जून 2020 रोजी संपुष्टात आला असल्याने नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत.