ताज्या बातम्यामहाराष्ट्र

45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

45 हजाराची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर यैलि दी.एन.डी. अ‍ॅन्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूलमधील वरिष्ठ लिपीकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द नवापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद साकरलाल पंचोली (50, व्यवसाय – नोकरी, वरिष्ठ लिपीक (दी.एन.डी.अ‍ॅन्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर जि. नंदुरबार) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम आलोसे यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती . तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात आलोसे विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडून 45000 रुपये लाचेची मागणी करून दि. 21 जून 2023 रोजी सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी , पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी , पोलिस हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, पोलिस नाईक देवराम गावित आणि अमोल मराठी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks