नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून सीपीआरसह कोरोना दवाखान्यानां 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप

रोहन भिऊंगडे / कोल्हापुर :-
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील कोरोना दवाखान्यांना द्यावयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात ही मशीन्स सीपीआर प्रशासनाला प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्यासह, औषध -पाणी व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सातत्याने सुरूच आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या ऑक्सिजन टंचाईवर आमच्या परीने पर्याय म्हणून सीपीआर -30, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय -20, कागल कोविड केअर सेंटर -25, इचलकंजीचे आयजीएम रुग्णालय -25, मुरगूड केंद्र – पाच, उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्र -पाच याप्रमाणे ही मशीन्स देण्यात येणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी म्हणाले, ऑक्सिजनच्या या आणीबाणीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन स्मुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनीमाऊची उपचारांमध्ये चांगली मदत होईल.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर, प्रदेश युवक सरचिटणीस आदिल फरास, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, दिनकरराव कोतेकर, राजेंद्र सुतार, अजिंक्य पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर -नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने सीपीआरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस.मोरे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.