कोल्हापुर जिल्ह्यात दूध विक्री राहणार सुरूच – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर /रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यात दूध विक्री सुरू राहणार आहे. तसेच दूध घरपोच विक्री करण्यास पोलिस सहकार्य करत आहेत. पोलिसांनी सकाळी दहा वाजल्यापासून जी दुकाने चालू असतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. दूध पुरवठा विक्री ही चालूच राहणार आहे.अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
कोणीतरी खोडसाळ पणाने उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात दूर विक्री बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
कोणालाही दूध विक्री करण्यास अडचण आल्यास 100 नंबरशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
दरम्यान गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण जाधव यांनी सांगितले आहे की दूध विक्री बंद करण्याबाबत कोणतीही संघटना अथवा विक्रेत्यांनी गोकुळ प्रशासन शी संपर्क साधलेला नाही. दरम्यान गोकुळची दूध विक्री सुरूच राहणार आहे. तसेच विक्री सुरु राहणार असल्याचे जिल्हा प्रशासन आदेश जारी करणार आहे असे समज