ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावा झाडे जगवा, उपक्रम फायदेशीरच

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कोरोना सारख्या महामारीमुळे देशात अनेक लोक नाहक जीव गमावत आहेत.अनेक लोकांना ऑक्सिजन अभावी जीव गेला आहे.अशावेळी भविष्यात अशा महामारी बरोबर लढा द्यावयाचा असेल तसेच पुढील पिढीसाठी अथवा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे “लावा झाडे, झाडे जगवा” असे उपक्रम
आता सर्रास गावपातळीवर राबविणे महत्वाचे बनले आहे.या साठी काही अंशी होणारी झाडांची कत्तल ही थांबली पाहिजे.या महामारीच्या काळात झाडांचे महत्व आणि ऑक्सिजनची काय किंमत आहे.हे आता साऱ्या जगाला कळून चुकले आहे.
गेले एक वर्ष जग कोरोना सारख्या महामारिमुळे जग त्रासले आहे. सर्वांनाच या महामारिला सामोरे जातात नाकी नऊ आले आहे. अनेक कोरोना रोग्यांना ऑक्सिजन कमी झाल्यानंतर द्यावा लागणारा ऑक्सिजन कमी पडत आहे.अशावेळी झाडांचे महत्व पहाता आता गावातील सर्व संस्था,सामाजिक संस्था,सर्व मंडळे,ग्रामपंचायत, अन्य कार्यालये ,अन्य सेवाभावी संस्था,प्राथमिक,माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण संस्था यांनी आता झाडे लावण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे ही गरज आपली नाही तर पुढील पिढीसाठी योगदान ठरणार आहे.यामुळे निसर्ग समतोल तर राखला जाईलच आणि पुढील पिढीला आवश्यक असणारा ऑक्सिजन ही मिळेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
शासन स्तरावरून ही वृक्ष मोहीम हाती घेऊन ऑक्सिजन मिळवून देणाऱ्या वृक्षांची निवड करून ती ग्रामीण स्तरापर्यंत पोहचवली पाहिजे.”एक मूल’ एक झाड” “एक व्यक्ती, एक झाड” याप्रमाणे झाडे ही लागण आणि जतन झाली पाहिजे.
ऑक्सिजन मिळवून देणाऱ्या झाडामध्ये पिंपळ, वड,निम,कडूनिम,तुळस,आंबा, तसेच आणखी ऑक्सिजन देणाऱ्या अशा झाडांची लागण केली तर आवश्यक असणारा ऑक्सिजन मुबलक प्रमाणात तर मिळेल.एक झाड कमीत कमी तीन ते चार माणसांना चोवीस तास ऑक्सिजन पुरवू शकते.या मिळणाऱ्या मुबलक ऑक्सिजनमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोरोनासारख्या महामारीवर विजयही मिळवता येईल.
झाडे आपला श्वास आणि जीवनही
झाडे ही मानवाचे मित्र आहेत त्यांना सांभाळले तर ते आपल्या ते श्वास हि देतील आणि जीवनही.मग त्यांना काळजी पूर्वक जपल गेलं पाहिजे.तर निसर्ग समतोल राखला जाईल आणि आनंदी जीवन जगता येईल.