कागल : पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते मेंढपाळाला ३२ हजारांची मदत ; पंधरवड्यापूर्वी तरसाने खाली होती बकऱ्याची पिल्ली

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पंधरवड्यापूर्वी कागल येथील श्री. खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरस या प्राण्याने हल्ला करून खाल्ली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांना वन विभागाच्यावतीने ३२ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.
आठवड्यापूर्वी त्यांना नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच; आठवड्यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या घटनेचा पंचनामा करून वन विभागाच्या वतीने शासकीय नियमानुसार आर्थिक मदत करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, माजी नगराध्यक्ष नवल बोते, वन विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले आदी प्रमूख उपस्थित होते.