गडहिंग्लज येथे मनसे सुरु करणार ५० बेडचे कोविड अलगीकरण केंद्र

गडहिंग्लज प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ५० बेडचे अलगीकरण कोविड सेंटर गडहिंग्लज येथे उभा करीत आहोत अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिली.
मनसे जिल्हाध्यक्ष चौगुले म्हणतात, कोल्हापूर जिल्हा त्यात ग्रामिनभागातील तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे.
आरोग्य व्यवस्थेला हातभार लागावा या उद्देशाने परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गडहिंग्लज येते 50 बेडचं मोफत अलगीकरण कोविड सेंटर उभा करीत आहोत असे चौगुले यांनी या वेळी सांगितले. पुढे म्हणतात,ज्या बाधित रुग्णांना कोणतीही लक्षण नसेल किंवा घरामध्ये राहण्यासाठी (अलागिकरणासाठी) पुरेशी व्यवस्था नाही. व बाधित रुग्णामुळे घरातील अन्य लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये. यासाठी अश्या रुग्णांना त्यांची अलागिकरणाची सोय म्हणून या केंद्राचा फायदा होणार आहे.
या केंद्रामध्ये पुरुष व महिला तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
कोरोनामुळे रुग्णांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी तसेच समुपदेशनासाठी मानसिक आधारची सर्वात मोठी गरज आहे.यासाठी रुग्णांना प्रशिक्षित डॉक्टरामार्फत योगा, प्राणायाम, तसेच आरोग्य उपयोगी दैनंदिन व्यायामाची व्यवस्था या केंद्रामध्ये रुग्णांची राहण्याची तसेच चहानाष्टा व जेवणाची सोय पूर्णपणे निःशुल्क (मोफत) असेल. याचबरोबर या केंद्रामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरस् यांची टीम व रुग्णांची देखभाल करण्यासाठी अनुभवी परिचारिकांचा समावेश आहे.