गोकुळ रणांगणात राजर्षि शाहू शेतकरी आघाडी मताधिक्याने विजयी होणार.- जिल्हा बँक संचालक व उमेदवार रणजितसिंह पाटील यांंचा विश्वास.

मुदाळतिट्टटा : प्रकाश पाटील
जिल्ह्याच्या दूध संस्थांची आर्थिक नाडी असलेल्या गोकुळ दूधसंघात सत्तांतर अटळ असुन , राजर्षि शाहू शेतकरी आघाडीचा विजय निर्विवाद असल्याचा विश्वास जिल्हा बँक संचालक व गोकुळचे उमेदवार रणजितसिंह पाटील यांनी आज गारगोटी येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
गोकुळ हि जिल्हृयातल्या हजारो दूध उत्पादक घटकांच्या मालकीची संस्था आहे. या संज्ञेला पूर्णविराम देणेसाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे मंत्रीमहोदय, आमदार,विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन गोकुळचे भविष्यातील व्हीजन यावर नवा जाहिरनामा दूध संस्थासमोर ठेऊन मतदानाचे आवाहन केले होते.यास उदंड असा प्रतिसाद मिळाल्याने विजयाची खात्री निश्चित आहे.
मी सामाजिक ,शैक्षणिक ,व सहकार चळवळीतला सर्व अनुभव गोकुळच्या विकासासाठी लाऊन राज्यात अमुल बरोबर गोकुळची बरोबरी करणेसाठी प्रयत्नशील राहणार असलेचा निर्वाळा रणजितसिंह पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.