शाहूवाडी तालुक्यातील ह्रदय हेलावून टाकणारी घटना!; ‘बाळा, काळजी करू नको आम्ही लवकर घरी येतो,’तुमची काळजी घ्या’……

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यामध्ये अनेकांची संपुर्ण कुटुंबच्या कुुटुंब संपली आहेत. असंत काहीसा प्रकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूरपैकी मलकापूरमधील पाटील कुटुंबोसोबत घडला आहे.
महादेव पाटील पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला होते तर त्यांची पत्नी एक खाजगी कंपनीत चांगल्या पदावर काम नोकरीला होती. ते आपल्या मुलांसोबत पुण्यातच रहायला होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते आपल्या कुटुंबासोबत मुळ गावी गेले. त्यानंतर महादेव पाटील यांच्या पत्नी सीमा पाटील यांना थोडासा त्रास जाणवल्याने त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली आणि त्यावेली दोघांच्याही चाचणीचा अहवाल हा दुर्देवाने पॉझिटिव्ह आला.
पाटील यांनी आपल्या मुलांना नातवाईकांकडे सोपवलं आणि दोघेही एका खासगी रूग्णालयात दाखल झाले. मात्र उपचारादरम्यान सीमा पाटील यांचा मृत्यु झाला. त्यानंतर पत्नीच्या मृत्यूमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या महादेव पाटील यांचाही मृत्यु झाला. कोरोनामुळे पाटील कुटुंबाची वाताहात झाली.
दरम्यान, जेव्हा पाटील आणि त्यांच्या पत्नी रूग्णालयात उपचारासाठी जाताना आपल्या मुलांन, आम्ही लवकर परत येऊ अस, असं म्हणून गेले होते मात्र त्यांना तिकडेच कोरोनाने गाठलं. आई-वडिलांच्या जाण्याने मुलांचं मातृ-पितृ छत्र हरपलं.
मुलांना अखेरचे दर्शन ही नाही
या दाम्पत्याचा मृत्यू झाल्यानंतर पंचगंगा घाटावर महानगरपालिकेच्या पथकाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. महादेव यांचा मोठा भाऊ कारण क्वारनटाइन असल्याने आला नाही. तसेच संसर्गाचा धोका असल्याने मुलांना आणले नाही.त्यामुळे मुलांना अंत्यदर्शन ही घेता आले नाही. त्यांच्या या जाण्याने पुर्ण शाहुवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.