ताज्या बातम्या
महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार : निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोरोना विषाणूमुळे यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभास जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.