दिव्यांग व्यक्तीच्या संघटीत ताकदीवर योजनेचा लाभ मिळतो . : दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार यांचे प्रतिपादन; दिव्यांग निधीचे आंबेवाडी ग्रामपंचायत मध्ये वाटप.

सावरवाडी प्रतिनिधी :
केंद्र शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवापर्यत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे . दिव्यांग व्यक्तीच्या संघटीत ताकदीच्या बळावर तळागाळापर्यत योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे . असे प्रतिपादन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार यांनी केले.
करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील ग्रामपंचायत तर्फ गावातील 12 दिव्यांग व्यक्तीना प्रत्येकी 5,325 धनादेशाचे वाटप कार्यक्रमात सुभेदार बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच सिंकदर मुजावर होते.
देशभरातील दिव्यांग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना या नवी संजीवनी देणाऱ्या आहेत असेही सुभेदार यांनी आपल्या भाषणात नमुद केले आहे.
यावेळी सरपंच सिंकदर मुजावर , ग्रामसेविका मिनाज नदाफ , उपसरपंच वेदा अतितकर,ग्रा.सदस्य तेजस सुतार,.भारत गायकवाड, .सुजय काटकर, आदिची भाषणे झाली . प्रारंभी नंदा शिपेकर यांनी प्रास्ताविक केले शेवटी शिवाजी चौगुले यांनी आभार मानले . ; सोशल डिस्टन्सचे नियम पाळून कार्यक्रमास दिव्यांग बांधव उपस्थित होते.