कोवीड 19 प्रतिबंधासाठी 100 टक्के ऑक्सीजन बेड कोवीड काळजी केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उभारणार – सभापती हंबीरराव पाटील

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
सध्या जागतिक स्तरावर कोवीड 19 विषाणू नवीन स्टेन आला असून या पूर्वीच्या साथीपेक्षा वेगाने या विषाणूचा प्रसार होत आहे. राज्यामध्ये अनेक शहरामध्ये या साथीने गंभीर परस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयामध्ये कोवीड 19 प्रतिबंधासाठी 100 टक्के ऑक्सीजन बेड सुविधा असलेले कोवीड काळजी केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उभारणी करण्याबाबतचे नियोजन सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी करण्याच्या सूचना आरोग्य व बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी दिल्या.
आरोग्य समिती सभा व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे आज सामिती सभागृहामध्ये संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. सभेस आरोग्य समिती सदस्य सविता राजाराम भाटळे, सुनिता रेडेकर, पुष्पा वसंत आळतेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोरे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, कमी तीव्रतेचे लक्षणे असलेल्या रुग्णाला कोव्हिड काळजी केंद्रामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये कोवीड काळजी केंद्राची उभारणीचे नियोजन तत्काळ करण्यात यावे. कोवीडची रुग्ण्संख्या वाढत असून येत्या काळात मोठया प्रमाणात ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासणार आहे. चिन्हे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी अलगीकरण करण्यात यावे. या रुग्णांची दररोज तपासणी करुन त्यांची दैनंदिन ऑक्सीजन तपासणी, थर्मल तपासणी करण्यात यावी. तसेच घरी अलगीकरण असलेल्या रुग्ण इतरत्र फिरणार नाही यांची दक्षता घेणे आवश्यक आहे. कामात शितीलता आल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. सुपर स्पेडरची रॅपीड ॲन्टीजन टेस्टकरण्यात यावी. सव्हेक्षण काम प्रभावी करण्यात यावे. सर्व प्रा. आ. केंद्राकडे असलेल्या ऑक्सीजन सिंलेडर तपासणी करुन आवश्यकतेनुसार भरण्यात यावे. रुग्णबाधित आल्यानंतर सहवासित शोध गांभिर्याने करावा. प्रत्येक रुग्णामागे किमान 20 सहवासितांच्या कोवीड टेस्ट करण्यात याव्यात.
कमी तीव्रतेचे लक्षणे असलेल्या रुग्णाला कोवीड काळजी केंद्रामध्ये दाखल करण्यासाठी आपआपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोव्हिड काळजी केंद्र उभारणी करण्यात यावी. यासाठी सामुदाय आरोग्य अधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांची मदत घ्यावी. ज्या त्या भागात कोव्हिड काळजी केंद्र उभारणी झाल्यामुळे रुग्णांची सोय यातून होणार असून रुग्णांना घरातून जेवण उपलब्ध होणार आहे. तक्रारींचे प्रमाणही कमी होईल. जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत असे सांगितले जाते. तथापि ही वस्तुस्थिती खरी नसुन, प्रत्यक्ष पाहणी केली असता बेड उपलब्ध असतात. यामुळे रुग्णांची अडवणूक होण्याचे, अर्थिक त्रासाचे प्रकार होत आहेत. यासाठी खासगी हॉस्पीटलची बेड उपलब्धतेसाठी अचानक तपासणी करण्यात यावी, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.