ताज्या बातम्या

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

नवी दिल्ली 

देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या वेगानं होताना दिसत आहे. कोरोनाबाधित बहुतेक रूग्णांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. पण बुधवारी नाशिकमधल्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यामुळे 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यात आता दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 400 रूग्णांना जीव गमवण्याची वेळ आली होती. यावर तातडीने सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरनं दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी रात्री तातडीची सुनावणी घेण्यात आली. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार मॅक्सनं आपल्या याचिकेमध्ये केली होती. आपल्याकडे फक्त 3 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून 400 रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं कोर्टाला सांगितलं होतं.

भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या, असं उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं आहे.लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का? ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या बाबीकडे केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे. सरकारच्या प्रस्थापित स्त्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल, तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, सध्याचा ऑक्सिजनचा पुरवठा हा अजिबात पुरेसा नाही. मग तुम्ही यावर आत्तापर्यंत केलं काय? स्टील प्लांट चालवणं इतकं महत्त्वाचं आहे का? टाटांना विचारा, ते मदत करतील. सरकारला वास्तवाचं भान का येत नाहीये का?, अशा कडक शब्दात न्यायालयाने सरकारला खडसावलं आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks