गडहिंग्लज येते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी.

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज “१३०” वी जयंती आहे. त्या निमित्ताने गडहिंग्लज येते भिमनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कोरोना परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या,स्वतःची आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या असे सांगितले तर पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले,लोकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत अजून म्हणावी तेवढी काळजी घेतली जात नाही तुम्ही काळजी घ्या आणि कुटुंबातील व्यक्तींची पण काळजी घ्या, विनाकारण बाहेर फिरणे टाळा असे मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेविका रेश्मा कांबळे, सुनीता पाटील, शंकूतला हातरोटे, वीणा कापशे, लता पालकर, अशोक कांबळे, भीमराव कोमारे, महेश सलवादे, रोहित सलवादे, संतोष कांबळे,पुंडलिक सावरे, मोहन बारामती, आप्पासो बारामती, संजय सावरे, दिगंबर विटेकरी, दयानंद गुंठे, बाबुराव शिंदे, भैरू कांबळे आदी उपस्थित होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत विटेकरी यांनी स्वागत केले तर सचिव वैभव बिरंजे यांनी आभार मानले.