Breaking : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास ‘ राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना ’अंतर्गत भरपाई मिळणार, राज्य महा एनजीओची नवी योजना

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास ‘राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजने’अंतर्गत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्याला आता आर्थिक संरक्षण मिळणार आहे. राज्य महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे ही नवी योजना आणली आहे. या योजनेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना अवघ्या 30 रु.मध्ये वार्षिक 1 लाखाचं विमा संरक्षण मिळणार आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास ‘राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजने’अंतर्गत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना
free fin mnda – mcda Insurance Powered By
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्याना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासाठी “ राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” सुरू करण्यात आली आहे. तसेच अपघातामुळे नुकसान होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यास सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील ३ ते १८ या वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व खाजगी शिक्षण संस्था अशा सर्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत, प्रत्येक विद्यार्थ्यास अवघ्या 30रु.मध्ये वार्षिक 1 लाखाचं विमा संरक्षण मिळणार आहे.
“राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करेल भारत देशाचे उज्ज्वल भविष्य हे देशाच्या युवक वर्गावर निर्भर आहे आणि म्हणूनच “ राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना” संपूर्ण महाराष्ट्रातील विदयार्थींना शाळेत अथवा कौशल्य विकास संस्थेत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.
शिक्षणासोबत शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे फार आवश्यक आहे यासाठी विमा योजना 365 दिवसातील २४ तासही लागू राहील म्हणजेच विद्यार्थ्यास कधीही अपघात झाल्यास किंवा आजारपण आल्यास विद्यार्थी विमा दाव्यासाठी पात्र असतो.
सर्व विद्यार्थी सुरक्षा योजना वैशिष्ट्ये
३ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
विमा
विद्यार्थ्यांसाठी रु.१ लाख वैयक्तिक अपघात विमा.
विद्यार्थ्यांसाठी रु. ५० हजार पर्यंत कायमस्वरूपी संपूर्ण किंवा कायमस्वरुपी अर्ध अपंगत्व विमा.
विद्यार्थ्यांसाठी अपघाती वैद्यकिय खर्च रू. १० हजार,विद्यार्थ्यांची सायकल चोरीला गेल्यास किंवा अपघाताने सायकलचे नुकसान झाल्यास रू. २ हजार,विद्यार्थ्याचे शाळेचे दप्तर चोरीला गेल्यास रू. ५०० ₹,
इत्यादी विमा कवच
वाहन अपघात, शाळेत खेळताना, झाडावरून, जिन्यावरून पडलेने किंवा इतर अनुशंगिक कारणाने हातापायास इजा झालेस, सर्पदंश, पाण्यात पडलेने, शॉर्ट सर्कीट, विषबाधा, विद्युत वाहनी तुटल्याने मृत्यु किंवा इतर अनुशगिंक इजा या बाबी समाविष्ट असतील.
या योजनेचा पालकांनी व शाळेनीं आपल्या मुलामुलींच्यासाठी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एनजीओ समिती राज्याध्यक्ष युवराज येडूरे यांनी केले आहे.
या बैठकीसाठी महाराष्ट्र एनजीओ समिती संपर्कप्रमुख संदिप बोटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदिप सरदेसाई यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.