औद्योगिक कामगारांची जागेवर जावूनच प्रशासना तर्फे अँन्टीजेन्ट चाचणी व लसीकरण करणार – मा. जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोरोना काळातही उद्योग सुरू आहेत, परंतु उद्योग सुरूठेवायचे असतील तर कामगारांचे लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे यापैकी आरटीपीसीआर चाचणी करून घेणेची अट रद्द करावी अशी मागणी कोल्हापूरातील सर्व औद्योगिक संघटनांच्यावतीने मा. कामगार मंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ यांचेकडे करण्यात आली होती, याबाबत चर्चाकरून निर्णय घेणेसाठी कोल्हापूरातील सर्व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांचेसोबत मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
श्री. सचिन मेनन यांनी कामगारांची आरटीपीआर चाचणी रद्द करावी कारण अशी चाचणी करण्यासाठी तशी पुरेशी यंत्रणा नाही व वेळ खाऊ प्रक्रिया असल्याने तसेच दर आठ दिवसानी ही चाचणी करावी लागणार असल्याने हजारो कामगारांची चाचणी लगेचच होणे शक्य नाही, त्यामुळे संपूर्ण कामगारांचे लसीकरून द्यावे व आरटीपीसीआर चाचणी रद्द करावी अशी मागणी केली.
याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई म्हणाले की, आरटीपीसी आर चाचणी ऐवजी प्रशासना तर्फे अँन्टीजेन्ट चाचणी कारखान्याच्या ठिकाणी जावून करणेची व्यवस्था केली जाईल. तसेच शासनाकडून लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास फक्त औद्योगिक क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण जिल्हाचे लशीकरण लवकरात लवकर पुर्ण करू.
ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे नाही परंतु तो पाॅझीटीव्ह आहे असे लोक सर्वत्र फिरत असतात त्यामुळे अशा लोकांना योग्यवेळी बाजूला करून कोरोनाचा फैलाव रोखणे आवश्यक आहे, त्यामुळे यासाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच १० एप्रिल ऐवजी १५ एप्रिल पर्यंत सदरची चाचणी करून घेण्यास मुदतवाढ दिली आहे.
संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर झालेतरी उद्योगांना यातून वगळावे अशी मागणीही उद्योजकांनी केली.
जर उद्योग बंद राहीलेतर फार मोठा आर्थिक फटका उद्योग तसेच राज्यालाही सहन करावा लागेल. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तीच नियमावली कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या जिल्ह्यांना लावू नये अशी विनंती सर्व उद्योजकांच्यावतीने करण्यात आली.
मा. मुश्रीफसो म्हणाले की, याबाबत उद्योजकांना ही मागणी आणि भावना मा. मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोचवू तसेच मा. मुख्यमंत्री हे नियमावली तयार करून लाॅकडाउन बाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत, त्यामुळे उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
अँन्टीजेन्ट चाचणी तसेच लशी करण करण्यासाठी प्रत्येक एमआयडीसी आणि शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी एक संर्पक अधिकारी नेमला जाईल व तसे आदेश मा. जिल्हाधिकारीसो लवकरच काढणार आहेत.
या सभेस सर्वश्री सचिन मेनन, हर्षद दलाल, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष अतुल पाटील, स्मॅक आयटीआय चे चेअरमन राजू पाटील, उपाध्यक्ष दिपक पाटील, श्रीकांत पोतनीस, अभय पंडितराव, गोरख माळी, संजय पेंडसे, सुमित चैगुले, संजय शेटे,
प्रदीप व्हरांबळे इ. उपस्थित होते.