गडहिंग्लज तालुका भाजपची महिला ग्रामीण कार्यकारणी जाहीर

गडहिंग्लज प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टी गडहिंग्लज तालुका महिला ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात आली.महिला तालुकाध्यक्षा जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिता चौगुले यांनी कार्यकारणीची घोषणा केली. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष राजेंद्र तारळे हे होते.भगतसिंग रोडवरील पक्षाच्या कार्यालयात जाहीर केले.
कार्यकारणी अशी:प्रा. अनिता चौगुले, अध्यक्षा सुनिता लोंढे,संजीवनी माने,अनिता रेडेकर,सुजाता कंकणवाडी,सारिका बटकडली,सविता पोवार, ज्योती देसाई,तृप्ती हांजी (सर्व उपाध्यक्ष)यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी अर्चना रिंगणे व सारिका नाईक तर कोषाध्यक्ष डॉ. रूपा रुद्रापगळ, चिटणीसपदी रेखा जाधव,शारदा पाटील,सोनाली घुगरे, सविता नाईक , गीता बंदी ,रोहिणी मोकाशी,कांचन मटकर यांची निवड करण्यात आली. या वेळी तालुका कार्याध्यक्ष प्रीतम कापसे , उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत , महिला शहराध्यक्षा डॉ . बेनिता डायस , सरचिटणीस अजित जामदार , राजे बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे , जिल्हा सदस्या निलांबरी भुईंबर , महिला शहर उपाध्यक्षा द्राक्षायणी घुगरी , युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार मुरगुडे , सचिन घुगरी , प्रशांत पाटील , संजय पाटील , संदीप माने , मारुती नाईक , रोहित पाटील , भीमराव कोमारे उपस्थित होते. चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.