ताज्या बातम्यामहाराष्ट्र
## BIG BREAKING## : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘कोरोना’चा बोनस ! सगळे सरसकट पास होणार!

मुंबई :
कोरोना ची स्थिती राज्यात दररोज गंभीर अवस्थेत जात असून, एका दिवसाला ऐंशी हजारावर रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना ची स्थिती आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळेच या अगोदर शिक्षण खात्याने घेतलेले निर्णय शिक्षण खात्याला आता बदलावे लागत असून, पाचवी ते आठवी नंतर आता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण खात्याने घेतला आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर आता सरसकट नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असून त्यांची परीक्षा घेतली जाणार नाही. ती ऑनलाइन अथवा ऑफलाइन कोणतीही घेतली जाणार नाही. असे शिक्षण विभागाने ठरवले आहे.