बिद्रीत आज प्राथमिक आरोग्य केंद्रासह १६ कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण
मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजयदादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे व बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके,
दि. १७ : बिद्री ता. कागल येथे अद्ययावत व सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रासह सुमारे १६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आज वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आयोजित केले आहे. या कार्यक्रमास खासदार संजयदादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आदी प्रमुख उपस्थित असणार आहेत. ग्रामपंचायतच्या पटांगणावर शुक्रवारी दि. १८ सायंकाळी ५.०० वाजता कार्यक्रम होणार असल्याची माहिती, संयोजकांनी यांनी दिली.
बिद्री येथील ग्रामस्थांच्या मागणीनूसार व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपूराव्यातून गावामध्ये अक्षरशः विकासगंगा आवतरली असून यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीसह प्रशासकीय कार्यालय व मीटिंग हॉल, ऑपरेशन थिएटर, प्रसुतीगृह,लॅबोरेटरीज, मेडिकल, लेबर रुम तसेच संरक्षित भित व डॉक्टर्स व परिचारकांसाठीची कर्मचारी निवासस्थाने असे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल ५ कोटी ५४ लाखांचा खर्च आला आहे.

तसेच, जलजीवन पाणीपुरवठा योजना २ कोटी, सन २०२०-२१ मधील पुर्ण कामे व सन २०२१-२२ मधील मंजूर कामे १ कोटी ३० लाख, बांधकाम विभागांतर्गत सन २०२०-२१ मधील पुर्ण कामे व सन २०२१-२२ मधील मंजूर कामे १ कोटी, मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पानंद रस्ते ४८ लाख, ग्रामविकास विभागांतर्गत २५१५ शिर्षकांतून सन २०२२-२३ मंजूर कामे १ कोटी १५ लाख, अर्थ संकल्पीय योजनेतून बिद्री – सोनाळी रस्ता रुंदीकरण ४ कोटी ५० लाख अशी सुमारे १६ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. तरी बिद्री पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे, असे अवाहन संयोजकांनी केले आहे