ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधानांना 24 तासात 3 वेळा फोन, ऑक्सिजन तुटवड्याने महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर

मुंबई प्रतिनिधी :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. या दोघांमध्ये महाराष्ट्रातील आणि मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत चर्चा झाली.

काल मुंबईतील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता होती. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन, महाराष्ट्रातील चिंताजनक परिस्थिती कळवली.

दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks