स्वतःच्या प्रयत्नाने नवीन वाट निर्माण करण्याची धमक युवकांनी ठेवावी : प्राचार्य मिलिंद पांगिरेकर

गारगोटी प्रतिनिधी :
मळलेल्या वाटेवरुन सर्वचजण चालतात पण स्वतःच्या प्रयत्नाने नवीन वाट निर्माण करण्याची धमक युवकांनी ठेवायला हवी, शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्यात असते तोच खरा कर्तृत्ववान असतो, असे उदगार प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी काढले.
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे इ.११ वी विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून प्राचार्य मिलिंद पांगिरेकर बोलत होते.
यावेळी इ.१२ वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी वाणिज्य विभाग – सुनील अनिल लाड, कु. कुसुम सर्जेराव पाटील, कु. समृद्धी शंकर देसाई तर कला विभाग – कु. सारिका संतोष शिंदे, ओमकार मोरे, बालमुकुंद दत्तात्रय कुंभार यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा. सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ. तृप्ती पाटील, कु. रोहिणी धामणे, कु. ऋतुजा राऊळ, आतिष कांबळे, सुनील लाड, समृद्धी देसाई, मेघा साळवी आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा. शेखर देसाई, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, पालक प्रतिनिधी सौ. देसाई यांच्यासह विद्यार्थी, विदयार्थीनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कु. पूजा पोवार यांनी आभार कु. प्रज्ञा खोत याने तर सूत्रसंचालन कु.भुमिका घोडके व समृद्धी खाटकी यांनी केले.