जीवनमंत्रताज्या बातम्या
महिला दिन विशेष : …सुनबाईंनी केला सासूबाईंचा सन्मान; महिला दिनी समाजाला दिला एक चांगला संदेश

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
आज समाजामध्ये आपण पाहतो की, सासू आणि सून यांचं नातं म्हणजे विरोधाभासाचं नातं काही ठिकाणी भांडणतंटे तर काही ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण, असच खेळीमेळीचं वातावरण असलेल्या कुटुंबात महिला दिनी सुनेनं चक्क आपल्या सासुचा सन्मान आणि आदर भाव ठेवत आपल्या शेत बांधावर सत्कार केला आणि समाजात एक चांगलाच आदर्श निर्माण केला.
राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी येथील माजी उपसरपंच सौ. मयुरी बरगे यांनी आपल्या सासुबाई सौ इंदुबाई बर्गे यांचा वयाच्या ७५ व्या वर्षी चक्क शेतातील बांधावर पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून सासू व सुन यांच्यामधील गोडवा आणखीनच घट्ट करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे.या सुनेच्या आदरभावाने सासुबाईचा ऊर आनंदाने भरून आला.आणि समाजासमोर एक चांगलाच आदर्श ठेवला आहे.
इतकेच नव्हे तर सासुबाई बद्दल बोलताना त्यांनी सांगितले “सासूबाई मला संसारात मदत करण्याबरोबरच माझ्या सोबत दिवसभर शेतातील कामाशी त्या टक्कर देत आहेत. त्याच बरोबर आपल्या दोन्ही मुलांच्यात संस्कार रुजवायला त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. त्यामुळे आज दोघेही भाऊ एकमेकाशी अगदी मित्राच्या नात्याने वागतात. तसेच त्या स्वतः अशिक्षित असून देखील दोन्ही मुलांना शिकवण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत.त्यांचा एक मुलगा प्रा.डी जी बरगे सांगली जिल्ह्यातील नामांकित राजपूत शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
एकंदरीत आमच्या सासूबाईंच्या मुळेच आमची संसाराची गाडी रुळावर आहे.
सासु आणि सुन यांचे नातं प्रेमाचं असावं
यावेळी बोलताना सासुबाई इंदुबाई बरगे म्हणाल्या ” प्रत्येक सुनेने आपल्या सासूचा आणि प्रत्येक सासूने आपल्या सुनेचा आदर राखला पाहिजे. समाजात सासू आणि सुनेचं नाते हे आई आणि मुलगी सारखं असावं त्यात कोणताही दुरावा अगर भांडण-तंटा असू नये.