पंचगंगा पुलावरून महिलेची उडी; वरिष्ठांकडून ‘या’ पोलीसांचे कौतुक

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
बुधवारी दुपारी कौटुंबिक वादातून कंटाळून पंचगंगा पुलावरून महिले ने मारली पंचगंगा नदीत उडी. ही घटना तेथील ग्रस्तसाठी जात असणारे हेडकॉन्स्टेबल राजेंद्र संकपाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात उतरून त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. संकपाळ यांच्या धाडसी वृत्तीमुळे त्या महिलेचे प्राण वाचले. पाचगाव येथील 25 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक वादातून त्रस्त होऊन पंचगंगा नदी परिसरात आली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिने वडणगे गावच्या बाजूने पंचगंगा नव्या पुलावरून नदी मध्ये उडी घेतली. यावेळी तिथे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र संकपाळ ग्रस्त वाहनातून पंचगंगा नदी जवळून निघाले होते. त्यांच्या ही घटना लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता नदीपात्र कडे धाव घेतली. काही स्थानिक नागरिकांची मदत घेऊन त्यांनी त्या महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या धाडसी वृत्तीने त्या महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले असून वरिष्ठांनी ही राजेंद्र संकपाळ यांचे कौतुक केले.