कुरुकली येथे महिला उद्योग व्यवसाय प्रशिक्षण संपन्न

कौलव प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या कुठूंबाला आर्थिक हातभार लावणेकरिता उद्योग व्यवसाय करणेचा मार्ग आत्मसात करावा.असे आवाहन चैतन्य संस्थेचे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षक सतिश वसगावकर यांनी केले. कुरुकली ता करवीर येथे चैतन्य संस्था राजगुरुनगर व महिंन्द्रा आणि महिंन्द्रा यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय महिला उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.. स्वागत आणि प्रास्तविक संघाच्या कार्यकर्त्यां शितल कुसाळे यांनी केले.अध्यक्षस्थानी अर्चना कांबळे होत्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्य प्रशिक्षक सतिश वसगावकर आणि संघ व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांच्या हस्ते करणेत आले.यावेळी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांनी मार्गदर्शन भाषणात प्रशिक्षणाचा हेतु सांगुन संघामार्फत संघामार्फत कार्यक्षेत्रातील १५ गावातील ५००महिलांना छोटे मोठे व्यवसाय करणेसाठी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगितले .या प्रशिक्षणात ५० महिलांनी सहभाग घेतला .शेवटी आभार वासंती पेडणेकर यांनी मानले.