ताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी

टीम ऑनलाईन :

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (16 मार्च) तिसरा टी 20 सामना (India vs England 3rd T20I) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

दरम्यान ही 5 सामन्याची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केलं. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे.

आतापर्यंत उभय संघात एकूण 16 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks