ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक माजी सैनिकांना संपर्क करण्याचे आवाहन

कोल्हापूर :रोहन भिऊंगडे

जिल्ह्यातील बेरोजगार एवं शेती व्यवसायावर अवलंबित तसेच कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक माजी सैनिक/विधवांना आवश्यक मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनीधीव्दारा जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यास इच्छुक जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवांनी आपले नाव, पत्ता, दूरध्वनी संपर्क क्रमांक दि. 10 एप्रिल पर्यंत फोन किंवा ई-मेलव्दारे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
चर्चासत्राची वेळ व ठिकाण नंतर सुचित केले जाईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks