ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई :

राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे इतर व्यक्ती विनाकारण बाहेर फिरले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा आक्रमक इशारा राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशारा वळसे पाटलांनी दिला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावं. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेचं लॉकडाऊन आणि आत्ताची संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे.
मुंबई शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे. आज आपण कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला समोरे जात आहोत. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. युद्धाच्या परिस्थितीत कोणालाही घरी रहा असं सांगावं लागत नाही. तुम्ही स्वत:हूनच घरी रहा. उलट तुम्हाला तळघरात रहायचा पर्याय असेल तर तुम्ही तेथे बसून राहा, जोपर्यंत शत्रुच्या हल्ल्याची शक्यता संपत नाही. जग सध्या युद्धाच्या अवस्थेत आहे. या लढाईत कोरोनाला दया नाही हे निर्विकार आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks