ताज्या बातम्या

पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करणार; पुरग्रस्त लोकांना मदत कार्यक्रम प्रसंगी शशिकांत खोत यांचे प्रतिपादन

सेनापती कापशी :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या बाजूने राहिला असून पुरग्रस्त लोकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन शशिकांत खोत यांनी व्यक्त केले.

करड्याळ ,नंद्याळ, अर्जुनवाडा व वडगाव येथील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे कीट , जमकाना व चादर अशा किटचे वाटप माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना शशिकांत खोत यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks